सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
शरीर संबंधास विरोध केल्याने जळोची ता.बारामती येथे एका महिलेवर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. याबाबत निवृत्ती शेडगे याच्यावर बारामती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ६६ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ फेब्रुवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास जळोची ता. बारामती जि पुणे येथे पिडीत महिलेने शंकर नागरी पतसंस्था सिनेमारोड बारामती येथुन माझे नावावरील काढुन आणलेले पैसे कपाटामध्ये ठेवत असताना निवृत्ती शेडगे रा जळोची ता बारामती जि पुणे हा त्याचे हातामध्ये पेट्रोलची बाटली घेवुन आला. व पीडित महिलेला म्हणाला, तु माझ्या बरोबर शरिर संबंध ठेवणार का असे बोलला त्यानंतर मी त्यास म्हणाले की माझे घराचे बाहेर निघुन जा मला कसलेच संबंध तुझ्याबरोबर ठेवायचे नाही असे म्हणाले असता त्याचा राग त्याला आल्याने त्याचे हातातील पेट्रोल माझे पाठीमागुन बाजुस फेकुम त्याच्या जवळील काडीपेटीमधिल काडी ओढुन माझ्या अंगावर टाकली,
त्यामुळे माझ्या अंगावरील साडीने पेट घेतला. मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेला आहे त्यानंतर मी ओरडत बाहेर आल्यानंतर शेजारील लोकांनी आग विझवली त्यानंतर माझे नातेवाईक माझे भाचे राजेद्र सुळ, ज्ञानदेव सुळ यांनी मला उपचारकामी बारामती महीला हॉस्पीटल येथे अँडमिट केले आहे. पीडित महिलेचे पाठीमागील बाजुस डोक्याचे केस जळाले असुन माने पासुन ते पायापर्यंत ठीकठीकाणी भाजलेल्या लहाण मोठ्या जखमा झाल्या आहेत. तसेच पुढील बाजुस तोंडाला हाताल भाजलेल्या जखमा झाल्या आहेत. व घरातील सामान जळाले आहे.
पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत.