सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गावर भरगाव चाललेल्या गॅस टँकर वरील मध्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसने भरलेला टँकर पलटी झाला.सुदैवाने अपघातात कोणीही दगावले नसून ही घटना किकवी ता.भोर गावच्या हद्दीत घडली.
एलपीजी गॅस भरलेला टँकर एन.एल ०१ एबी ७५२३ कोचीन वरून गुजरात येथे जात असताना बुधवार दि.३१ रात्रीच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर किकवी (ता. भोर) गावच्या हद्दीतुन जात होता.टँकर वरील मद्यधुंद चालक पूर्ण नशेत असल्यामुळे त्याचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकरची डावी चाके महामार्गाच्या डाव्या बाजुच्या कठड्यावर गेली.त्यामुळे टँकर महामार्ग आणि सर्व्हिस रोड मधील चारीत पलटी झाला.सुदैवाने या अपघातात टँकर चालक किरकोळ जखमी झाला.