Baramati News ! दीपक जाधव ! 'जनाई'साठी गेली सहा दिवस त्यांनी संघर्ष केला : उपोषण सोडताच ग्रामस्थांनी फटाके वाजवून जल्लोष केला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दीपक जाधव 
जनाई उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी मिळण्याच्या १२ मागण्या मंत्रालयातील बैठकित मान्य झाल्याने सुपे ( ता. बारामती ) येथे बेमुदत सुरु असलेले उपोषण बुधवारी (दि. ३१ ) मागे घेण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना सरबत पाजुन उपोषण सोडण्यात आले. 
         सुपे येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने जनाईच्या हक्काच्या पाण्यासाठी गेली सहा दिवस उपोषण सुरु होते. मंगळवारी मंत्रालयातील बैठकित १२ मागण्या मान्य करण्यात आल्या.
       त्यामुळे सुपे येथे बुधवारी बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे, जनाईचे कार्यकारी अभियंता महेश कानिटकर, खडकवासला पाठबंधारे विभागाच्या अभियंता श्वेता कुऱ्हाडे, चासकमानचे अधिकारी गुंजाळ, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, एस. एन. जगताप आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
         यावेळी माजी सभापती दिलीप खैरे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकितील निर्णयाचा सविस्तर आढावा शेतकऱ्यांसमोर मांडला. तर श्वेता कुऱ्हाडे, एस. एन. जगताप, संभाजी होळकर, ज्ञानेश्वर कौले आणि उपोषणकर्ते पोपट खैरे आदींनी मनोगत व्यक्त केले. 
      त्यानंतर उपोषणकर्ते पोपट खैरे, भानुदास बोरकर आणि सचिन साळुंके आदींना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व जेष्ठ नागरिक बळवंत बोरकर, नानासो लडकत आणि जेष्ठ महिला कमल खैरे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत पाजुन उपोषण सोडण्यात आले. 
       यावेळी सुप्यात उपोषण सोडल्यावर  शेतकऱ्यांच्यावतीने फटाके फोडुन आनंद व्यक्त केला. तर उपोषणकर्त्यांची बाजरपेठेतुन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी आझाद मैदानावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर दर्ग्यात जावुन ख्याजा शाहमन्सुर बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. दत्तात्रय बोरकर यांनी केले. तर आभार विजय खैरे यांनी मानले. दरम्यान काही अनुचित प्रकार होवु नये यासाठी सुपे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता. 
       ......................................
To Top