सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब कामथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपाध्यक्षा प्रणिता खोमणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदी ही निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या नाव राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवलेल्या नावावर मासिक सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक संग्राम सोरटे, सुनील भगत, ऋषि गायकवाड, शिवाजीराजे निंबाळकर, आनंदकुमार होळकर, विश्वास जगताप, प्रवीण कांबळे, प्रणिता खोमणे, कमल पवार, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, तुषार माहुरकर, शांताराम कापरे, हरिभाऊ भोंडवे, किसन तांबे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे निबंधक कार्यालयाच्या उपनिबंधक शीतल पाटील यांनी काम पाहिले, त्यांना सचिव कालिदास निकम यांनी सहकार्य केले.