सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर पंचायत समिती यांच्या वतीने २०२३-२४ साठी दिल्यागेलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील ६२ शिक्षकांचा सन्मान पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सर्वांगीण विकास यासाठी उल्लेखनीय कामकाजाबद्दल पुरंदर तालुक्यातील निरा केंद्राअंतर्गत येणाऱ्या कोंडेवाडी प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सलीम शेख यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने यांना गौरविण्यात आले. सलीम शेख हे निरा गावाचे रहिवासी असुन पुरंदर तालुक्यात उपशिक्षक म्हणून गेली १९ वर्षे सेवा बजावत आहेत. तालुक्यातील मुकदमवाडी, जेऊर, कोंडेवाडी या शाळामध्ये त्यांनी सुरवाती पासूनच शैक्षणिक गुणवत्ता व शालेय सर्वांगीण विकास याबाबत भरीव योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडेवाडी याठिकाणी कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात असलेल्या त्यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या कामाची दखल घेत पुरंदर पंचायत समिती प्रशासनाने २०२३-२४ साठी चा पंचायत समिती आदर्श गुणवंत शिक्षक हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गट विकास अधिकारी अमिता पवार, गट शिक्षाधिकारी निलेश गवळी, विस्तार अधिकारी सतीश कुदळे, केंद्र प्रमुख भाऊसो नाझीरकर आदी उपस्थित होते.