सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचा संपूर्ण उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ कटीबद्ध असून सोबत कारखान्याकडे मुबलक यंत्रणा असल्याने क्षमतेपेक्षा जास्त दैनंदिन गाळप कारखाना करत आहे. त्यामुळे सभासदांनी इतर कारखान्या ऊस घालू नये असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.
सोमेश्वर कारखान्याने चालू गाळप हंगामात आजअखेर ८ लाख २६ हजार मे.टन उसाचे गाळप करत ९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा जिल्ह्यात ११.४६ च्या सरासरीने क्रमांक एकचा साखर उतारा व जिल्हयात क्रमांक एकचे गाळप आहे. जगताप पुढे म्हणाले, कारखान्यातील प्रत्येक घटकाच्या सिंहाच्या वाट्यामुळे सोमेश्वरचा राज्यात नावलौकिक आहे. मागील दहा वर्षात कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे चार पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राज्यात ऊसाला उच्चांकी दराची परंपरा सोमेश्वर ने कायम राखली आहे. कारखान्यामुळे परिसराचा कायापालट झालेला आपणास पहावयास मिळतो. एक हजारवरून आज नऊ हजार गाळप क्षमतेचा कारखाना झाला आहे. पूर्वी उसापासून फक्त साखर हाच व्यवसाय होता. मात्र आता डिस्त्रलरी, अल्कोहोल, इथोनॉल, सहवीज निर्मिती असे प्रकल्प उभे राहिले. लवकरच ३६ मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू होतील तसेच डिस्टलरीचे विस्तारीकरण ही सुरू आहे. असे जगताप यांनी सांगितले.
COMMENTS