सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
मध्यंतरीच्या काळात सरकारने सहकार क्षेञाला प्रोत्साहन देण्याचे धोरण कमी केले होते . त्याचा परिणाम सहकार चळवळीवर झाला.तसेच सरकारने बदललेल्या धोरणांमुळे नीरा बाजार समिती सारख्या अनेक सहकारी संस्था अडचणीत आल्या.नीरा व परिसरामधील शेतक-यांनी पिकविलेला भाजीपाला, टोमँटो बाजार सुरू करून शेतक-यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नीरा बाजार समितीने प्रयत्न करावा असे आवाहन सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजीराव काकडे यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी ( दि.३) सकाळी अकरा वाजता लिलाव पद्धतीने कांदा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शहाजीराव काकडे बोलत होते. यावेळी मार्केटिंग फेडरेशन संचालक शामकाका काकडे, संभाजी होळकर, तेजश्री काकडे, प्रदीप पोमण, गणेश जगताप, विराज काकडे, राजेश काकडे, राजेश चव्हाण, उत्तम धुमाळ, लक्ष्मणराव चव्हाण, अनिल उरवणे, नंदकुमार जगताप,महादेव टिळेकर, संदीप धायगुडे , डॉ.वसंतराव दगडे, सचिव मिलिंद जगताप यांच्यासह कांदा व्यापारी , शेतकरी व संचालक मंडळ उपस्थित होते.
काकडे पुढे म्हणाले की, कांदा बाजार सुरू करणे अवघड नसते परंतू ते टिकविणे हे खुप अवघड असते . संचालक मंडळाचे प्रयत्न, शेतकरी, व्यापारी व हमाल - मापाडी या घटकांनी एकमेकांमध्ये विश्वास ठेऊन कांदा बाजार टिकवावा. त्यामुळे पुन्हा नीरा बाजार समिती नावारूपाला येईल.
प्रास्ताविक सभापती शरद जगताप यांनी केले. स्वागत देविदास कामथे यांनी केले तर आभार संदीप फडतरे यांनी मानले.
-----------------------------------------------------------
पहिल्या दिवशी १४०० कांदा पिशव्यांची आवक
नीरा बाजार समितीत पहिल्याच दिवशी १४०० कांदा पिशव्यांची आवक झाली. सरासरी ९५० ते १हजार ७५१ रूपये क्विंटल कांद्याला लिलावात दर मिळाला असून राज्यात कांद्याला चांगला दर नीरा बाजार समितीत देणार असल्याचे सभापती शरद जगताप यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------
COMMENTS