सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावलीत पर्यटन वाढत असून सातारा मेढा महाबळेश्वर या रस्त्यावर पर्यटकांची वाहतूक वाढली आहे याचा फायदा छोटया मोठया व्यवसायकांनी करून घेतला पाहिजे. लहान वयात वडीलांचे छत्र हरविलेल्या संतोष आणि सोमनाथ या दोन बंधूनी अत्यंत कष्टातून वडीलांनी सुरू केलेला व्यवसाय त्यांच्या पश्चात आई हौसाबाई यांना आधार देत वाढवला आणि त्याचे आज कारखान्यात रूपांतर झाले आहे .
ही कौतुकाची बाब आहे. बाजार पेठेचा अभ्यास करून वेगवेगळी उत्पादने करावीत . आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी आम्हीही आपणास लागेल ते सहकार्य निश्चित करु असे आश्वासन आ. भोसले देवून " शुभलक्ष्मी चिवडा " सातासमुद्रापार पोहोचला पाहिजे असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
रिटकवली शुभलक्ष्मी फुडस् प्रा. लि. .शुभलक्ष्मी फुड अॅड नमकीन कार्निव्हल या कंपनीच्या शुभारंभ आ . श्री.. छ.. शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ यांचे शुभहस्ते संपन्न झाला . या प्रसंगी आ. भोसले बोलत होते.
प्रारंभी आ. श्री. छ्. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शुभहस्ते व मान्यवरांचे उपस्थीत फित कापून व कै. विष्णू शेठ मर्ढेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येवून दिपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी माजी आ. सदाशिवभाऊ सपकाळ , प्रतापगडचे चेअरमन सौरभ शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कैलास भेळ खेड शिवापूरचे उद्योजक शिवराज मिठारे, अॅड. शिवाजीराव मर्ढेकर , माजी सभापती सौ धनश्री कारंजकर, एकनाथ ओंबळे, पांडूरंग जवळ , कांतीभाई देशमुख , आनंदराव सपकाळ, प्रविणमहाराज शेलार , शिवाजीराव घोरपडे , शंकरराव मर्ढेकर , सागर धनावडे, सरपंच सौ कांता मर्ढेकर, विजय कारंजकर, जगन्नाथ मर्ढेकर (बुवा), डिसीसी बॅकेचे मर्ढेकर साहेब, अविनाश कारंजकर यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.
याप्रसंगी बोलताना माजी आ . सदाशिव सपकाळ म्हणाले विष्णु शेठ मर्ढेकर यांनी त्या काळी मुंबई सोडून गावी आल्यावर किराणा व्यवसाया बरोबर चिवड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी सुरु केलेला व्यवसाय हा तिसऱ्या पिढीने अत्यंत जिद्दीने , चिकाटीने व मेहनतीमळे छोटयाशा व्यवसायाचे कारखान्यात रूपांतर केले ही अभिमानाची गोष्ट आहे. या कुंटुबियांनी रिटकवली सह जावली तालुक्याचे नांव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवले आहे. यांची अशीच उत्तरोत्रर प्रगती होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त केली.
प्रतापगड कारखान्याचे व्हा . चेअरमन अॅड. शिवाजीराव मर्देकर यांनी ही आपल्या भाषणातून मर्ढेकर कुटुबीयांच्या मेहनतीचे कौतुक करून व्यवसायास शुभेच्छा दिल्या. तसेच माजी अर्थ समिती सभापती अमितदादा कदम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधु चिकणे , प्रिया शिंदे आदी मान्यवरांनी शुभलक्ष्मी फुडस् कारखान्यास सदिच्छा भेट देवून मर्ढेकर कुटुबीयाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध स्पर्धा परिक्षेत चमकलेल्या जावलीतील गुणवंताचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. मर्ढेकर कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी जावली , महाबळेश्वर व सातारा तालुक्यातील व्यापारी , हितचिंतक , व मान्यवर उपस्थीत होते. सुरज मर्ढेकर यांनी प्रास्ताविक करताना आजोबांनी सुरु केलेल्या व्यवसाया बाबत माहीती देत असताना आजोबांचे स्वप्न पुर्णत्वास नेल्याचा आनंद व्यक्त केला. अविनाश कारंजकर यांनी आपल्या भाषणातून संतोष १० वीत शिकत असताना वडीलांचे दैर्दुवी निधन झाले. त्यामुळे सर्व जबाबदारी संतोषवर असताना मनाला खचुन न देता व्यवसायात प्रगती करण्यासाठी आम्ही सर्वोतपरी मदत करून वडीलांच्या अकाली जाण्याची जाणिव संतोष व त्यांच्या कुटुबीयांना होवुन दिली नाही असे सागुन कारंजकर यांनी मर्ढेकरांच्या व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख मांडला. यावेळी कृष्णा मर्ढेकर, महादेव मर्ढेकर, अंकुश मर्ढेकर, सुरज मर्ढेकर आणि सुमित मर्ढेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शुभलक्ष्मी व्यवसायाला सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांचा सन्मान मर्ढेकर कुटुबीयांचे वतीने स्मृती चिन्ह देवुन करण्यात आला. शुभलक्ष्मी फुडस् चे मालक संतोष मर्ढेकर व सोमनाथ मर्ढेकर यांनी उपस्थीतांचे स्वागत केले तर अशोक लकडे ( गुरुजी ) यांनी सुत्रसंचलन व आभार मानले.
COMMENTS