सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
कुस्ती मल्लांचे गाव समजल्या जाणाऱ्या आंबाडे ता.भोर येथील श्री जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या जंगी कुस्ती आखाड्यात पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील २०० हून अधिक मल्लांनी हजेरी लावून नेत्रदीपक कुस्त्या करीत कुस्ती शौकिणांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
जानुबाई देवीची यात्रा बुधवार दि.३१ भरली गेली होती. यात्रेच्या प्रारंभी देवीला अभिषेक,महापूजा, सायंकाळी काठी-पालखीची ग्रामप्रदक्षिणा, देवीचा पारंपारिक वाद्यांच्या निनादात छबिना तर गुरुवार दि.१ बहुरंगी तमाशाचे आयोजन केले होते.तदनंतर जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता या आखाड्यात भोर तालुक्यासह इतर तालुके तसेच जिल्ह्यातून नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. बहुतांशी मल्लांनी चित्रपट कुस्त्या करीत कुस्ती सेवकिनांची मने जिंकली.मल्लांना १०१ ते २५ हजार पर्यंत मल्लांना इनाम देण्यात आले.यावेळी ग्रामस्थांसह तरुणांनी योग्य नियोजन करून आखाडा पार पाडला.यावेळी पंच म्हणून पै.शिवाजी खोपडे,शशी खोपडे ,हरी खोपडे ,सतीश शेलार ,आण्णा खोपडे,अनिकेत खोपडे यांनी काम पाहिले.
मुलींच्या कुस्त्या ठरल्या आकर्षण
मागील काही वर्षांपासून मुलांच्या कुस्त्यांबरोबरच मुलीही कुस्ती क्षेत्रामध्ये भाग घेत आहेत.आंबाडे येथील कुस्ती आखाड्यात मुलींच्या कुस्त्या आकर्षण ठरल्या असून पै.साक्षी बळे ,अनुराधा खोपडे, साक्षी भिलारे, समृद्धी ढमढेरे ,समीक्षा लवटे व पै.दर्शना म्हस्के यांनी नेत्रदीपक कुस्त्या केल्या तर महाराष्ट्र चॅम्पियन सिद्धी खोपडे हिचा आखाड्यात सत्कार करण्यात आला.
COMMENTS