सातारा-माण ! धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने दखल न घेतल्यास आत्मदहन करणार : उपोषणकर्ते गणेश केसकर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माण : प्रतिनिधी
महाराष्ट्र मध्ये सध्या धनगड ही जमातच अस्तित्वात नसून जे आहे ते धनगरच आहेत  यामुळे धनगर समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी गेली सत्तर वर्षांपासून वंचित ठेवलेल्या धनगर समाजाची धनगड ची दुरुस्ती धनगर अशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी व धनगर समाजाचा एसटी आरक्षणात समावेश व्हावा यासाठी गेली अकरा दिवसापासून म्हसवड या ठिकाणी उपोषणास बसलेल्या धनगर बांधवांनी राज्य सरकारला दिला आहे.
          माण तालुक्यातील म्हसवड येथे धनगर समाजाचे तीन बांधव  गणेश केसकर. उत्तम विरकर. व जयप्रकाश फुलवान उपोषणास बसले आहेत आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे त्यांनी कोणतीही वैद्यकीय सुविधा घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून समस्त धनगर समाज एकवटला आहे.
 उपोषणाच्या आठव्या दिवशी संपूर्ण माण तालुका बंद अशी हाक देण्यात आली होती त्यासही संपूर्ण मान तालुका बंद ठेवून भरघोस पाठिंबा मिळाला होता                         माण तालुक्याचे डी वाय एस पी. प्रांत अधिकारी. तहसीलदार ‌  व आमदार जयकुमार गोरे यांच्या व्यतिरिक्त आज अखेर उपोषणाच्या अकराव्या दिवसापर्यंत शासनाचा एकही प्रतिनिधी उपोषण स्थळी दाखल न झाल्याने समस्त धनगर समाज आक्रमक झाला असून. या उपोषणकर्त्यांकडे व समस्त धनगर समाजाच्या न्याय मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे मसवड येथील झालेल्या इशारा मेळाव्यातून राज्य सरकारला इशाराही देण्यात आला होता. म्हसवड येथे उपोषण करताना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्व उपोषणकर्ते दाखल झाले आहेत. माण तालुका मुस्लिम संघटना. वकील संघटना. व इतर काही संघटनांनी या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे.
 यावेळी समस्त धनगर समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी ‌ व राज्य सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या काही दिवसात शासनाने आमची दखल न घेतल्यास. रस्ता रोको ‌ तसेच सरकारी ऑफिसमध्ये शेळ्या व मेंढ्या सोडणे. व शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आत्मदहन करणार आहोत असा निर्वाणीचा इशारा दिला. 
To Top