शिरोळ l चंद्रकांत भाट l शिरोळचे शेतकरी अमर पाटील कुटुंबियांनी घातले 'लक्ष्मी'चे डोहाळे जेवण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : चंद्रकांत भाट
गाय हमारी माता है अमृत की दाता है ! या उक्तीप्रमाणे हिंदू धर्मात देशी गाईला अनन्यसाधारण महत्त्व असून आपल्या मातेप्रमाणे गाईचे संगोपन केले जाते यामुळे येथील प्रगतशील युवा शेतकरी अमर पाटील यांनी आपल्या लक्ष्मी या देशी गाईचे डोहाळे जेवणाचा समारंभ आयोजित करून मुक्या प्राणी प्रेमाविषयी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे
 शिरोळमधील अमर अरविंद पाटील यांच्या लक्ष्मी देशी गाईचे डोहाळे जेवण सोहळा उत्साहात झाला आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही मुक्या प्राण्यांवर करीत असतो विशेषता देशी गाईवर कुटुंबातील सर्वांचे प्रेम असते. वृद्ध मुलगी म्हणून तर  युवा वर्ग आपली आई म्हणून या गाईचा सांभाळ करीत असतो त्यामुळेच गर्भवती महिलेच्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. तशाच पद्धतीने अमर अरविंद पाटील व त्यांच्या परिवाराने आपल्या लाडक्या लक्ष्मी या देशी गायीचे डोहाळे जेवण घालून एक अनोखा संदेश दिला आहे.गायीच्या या डोहाळ जेवणाला मिष्टांग स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्य प्रमाणेच मुक्या प्राण्यांचे पालन संगोपन करीत असतो याची प्रचिती सातत्याने येत आहे यामध्ये युवा शेतकरीही पारंपारिक वारसा जपत असताना मुक्या प्राण्यावर अफाट प्रेम करीत आहेत यामुळेच अमर अरविंद पाटील लक्ष्मीच्या डोहाळे जेवणाचा संभारंभ आयोजित केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य इंद्रायणी पाटील भाग्यश्री लडगे यांच्यासह परिसरातील महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व पाटील यांचा मित्रपरिवार ही उपस्थित होता पाटील कुटुंबातील ज्येष्ठ इंदुबाई पाटील शालन पाटील विजयामला पाटील राजनंदिनी पाटील अथर्व पाटील या कुटुंबीयांनी उपस्थितांचे स्वागत केले .
To Top