भोर l वीसगाव खोऱ्याच्या गणेशखिंडीतील गनोबाची प्राणप्रतिष्ठापना : धावडी, नेरे परिसर गनोबाच्या जयघोषाने दुमदुमला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे,धावडीच्या शिवेवर असलेल्या पुरातन काळातील स्वयंभू गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहन व जयंती सोहळा उत्साहात पार पडला.गनोबाच्या जयघोषाने पंचक्रोशीतील परिसर दोन दिवस दुमदुमून गेला होता.
     छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत व सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत बसलेल्या धावडी,नेरे ता.भोर गावच्या सरहद्दीवर पुरातन काळापासून स्वयंभू पाषाणाची गणेश मूर्ती वसलेली होती.गणेश खिंडीतील नवसाला पावणाऱ्या गणोबा मंदिराचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहभागातून नूतनीकरणाचे काम करण्यात आले. मंदिराचे काम पूर्ण होऊन गणेश मूर्ती प्रानप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण रविवार दि.११ हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत बालब्रह्मचारी गुरुवर्य पंडितबाबा नागरगोजे महाराज (आळंदी) यांच्या हस्ते करण्यात आले.श्री क्षेत्र धावडी (गणेशखिंड )येथे दोन दिवस भजन ,कीर्तन ,प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले असून गणेश मूर्तीची भव्य अशी ग्रामप्रदक्षिणा पारंपारिक वाद्यांच्या निराधार काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान नेरे-धावडी पंचक्रोशीतील लहान- थोरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी धावडी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.
-----------------------
तरुणांच्या एकजुटीची सचोटी
गणेश खिंडीतील गणोबाचे मंदिर बांधण्याचे ठरले आणि धावडी तरुणांनी एकजुटीने कामाला लागून दोन ते तीन महिन्यातच शंभर वर्षांपूर्वीच्या गणोबाच्या मंदिराची नूतनीकरण करून प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम जोखमीने पार पाडला यातूनच तरुणांची सचोटी दिसून आली.
To Top