सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मधील चिमुकल्यांनी आनंद बाजार आणि खाऊ गल्ली मोहोत्सवाचे आयोजन केले होते.
येथील विद्यार्थ्यांना शाळेत मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याची संधी मिळावी. त्याचे व्यवहारिक जीवनाशी सांगड घालता यावी. त्यांचे संभाषण कौशल्य वाढवावे, वस्तूचे देवाणघेवाण व हिशोब करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी. या उद्देशाने शाळेमध्ये आनंद बाजार व खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या मोहोत्सवात सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये पाणीपुरी, वडापाव, मिसळ - पाव, इडली - सांबर, मसाला डोसा, आईस्क्रीम, गोड पान, मंचुरियन, चिकन ६५, गोलगप्पे, ओली व सुकी भेळ, बटाटा भजी, व्हेज बिर्याणी, केक, पोहे, गुलाबजाम, चॉकलेट, बिस्किटे, चिक्की तसेच भाजीपाला, कडधान्ये आणि फळे असे ५० ते ५५ स्टॉल लावण्यात आले होते. या बाजारात अवघ्या तीन तासात सुमारे २५ ते ३० हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.
यावेळी खाऊ गल्लीमधील खाद्यपदार्थांचा लहानांसोबतच मोठ्यांनी देखील आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी येथील उपसरपंच अश्विनी सकट, ग्रा. पं. सदस्य विलास वाघचौरे, शफिकभाई बागवान, शंकर शेंडगे, अश्विनी जाधव, वैष्णवी बारवकर, पूजा निकाळजे तसेच संजय बारवकर, विलास धेंडे, असिफ कोतवाल, सूर्यकांत व्यवहारे, सुधीर स्वामी, सलीम इनामदार आणि येथील ग्रामस्थ - पालक व शिक्षकांनी या सर्वांनी उपस्थित राहून आनंद घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केले होते.
.......................................