सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील ५२० दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्यावतीने साधारण ३३ लाख रुपयांच्या ८८७ वेगवेळ्या वस्तुंचे वाटप करण्यात आले असून त्याचा आनंद मला होत आहे. केंद्र सरकारने तळागाळातील लोकांच्या योजना कागदावर न ठेवता त्या तळातील सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोचविल्या त्यामुळे पतप्रधान मोदी साहेबांच्या आपण पाठीशी राहीले पाहिजे असे आवाहन आ. श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग,आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO) कानपूर, जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती जावली(मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती जावली (मेढा ) येथे पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित दिव्यांगच्या साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जावली महाबळेश्वर बाजार समितीचे संचालक हणमंत शिंगटे , गटविकास अधिकारी मनोज भोसले , गटशिक्षण अधिकारी संजय धुमाळ , अलिमको संस्थेच्या ज्युनियर मॅनेजर डॉ.श्रीमती. अभिलाषा ढोरे , डॉ. निरज मोरया , डॉ.सृजन भालेराव ,डॉ. श्रीमती.अंजली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले दिव्यांगासाठी बॅटरी ऑपरेटर मोटराईज सायकल, स्मार्ट फोन असे वेगवेगळे साहित्य मिळत आहे. . भारत सरकारच्या आणि अलिंमको संस्थेच्या माध्यमातून हे केल जात आहे. ही भारत सरकारची कंपणी आहे असे सांगुन ते पुढे म्हणाले ही योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविली जात असताना तालुक्यातील अजुनही लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहीले आहेत. या कॅम्प त्यांच्या पर्यंत पोहचला नसेल त्यामुळे राहीलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा लाभ मिळावा त्यासाठी लागेल ती मदत, सहकार्य मी अलिंमको कंपनीला करण्यास तयार आहे असेही आ. श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले मोदी साहेबांची, केंद्रशासनाची ही योजना प्रत्येक नागरीकाला आणि तळातील घटकाला ही मदत पोहचविण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न या माध्यमातून होतोय हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी पंतप्रधान मोदी साहेबांना आशिर्वाद द्यावेत असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले केंद्र सरकारच्या योजना कागदावर न राहता एवढया मोठया प्रमाणात आमच्या पर्यंत पोहचल्या हे पारदर्शक कारभाराचे उदाहरण आहे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे असे आ. श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
सध्या नोकऱ्यांच्या मागे न पळता केंद्र सरकारच्या वतीने बारा बलुतेदारांना ट्रेनिंग दिले जाणार असून त्यासाठी ५०० रु मानधन दिले जाणार आहे त्यामुळे योजनेमध्ये सहभागी होवुन सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन आ. श्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केले.
गट विकास अधिकारी मनोज भोसले यांनी याप्रसंगी प्रास्ताविकामध्ये दिव्यांग बांधवांनी भौतिक प्रगती बरोबर आर्थिक प्रगती सुद्धा करावी तसेच अलिंमको संस्थेने उर्वरित राहिलेल्या दिव्यांग बांधवांकरीता पुन्हा या प्रकारचे शिबिर आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच अलिंमको संस्थेच्या डॉ. श्रीमती डोरे यांनी संस्थेच्या बद्दलचे विविध योजनांची माहिती उपस्थिताना दिली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपज्वलन करण्यात आले. प्रतिनिधीक स्वरूपात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांना आमदारांच्या हस्ते स्मार्टफोन , श्रवण यंत्र , तीन चाकी सायकल , बॅटरी ऑटोमॅटिक बॅटरी तीन चाकी सायकल, व्हील चेअर , अंध काठी व इतर विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. मोहीते यांनी सुत्र संचालन केले तर आभार विशाल रेळेकर यांनी मानले.