सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रमोद पानसरे
कोर्हाळे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व बारामती पंचायत समितीचे माजी सभापती, प्रदीप धापटे यांना नुकताच सिद्धेश्वर भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष सुनील भगत यांच्या हस्ते यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रदीप धापटे हे .मे.धापटे इरिगेटर्स चे संचालक असून, पंचायत समितीचे माजी सभापती होते. गेले तीस वर्षापासून, कोर्हाळे बुद्रुक आणि पंचक्रोशीत, शेतकऱ्यांच्या पीक पद्धती व जलसिंचनाच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गरजू आणि अनाथ, आई किंवा वडील हयात नसलेल्या मुलांचा अनेक वर्षापासून, शैक्षणिक जबाबदारी ते उचलता, तसेच वृद्ध ,अपंग, विधवा, परितक्ता, या गरजवंतांचे आधार म्हणून त्यांना वेगवेगळ्या योजना निशुल्क त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा दिनक्रम आहे. या कामाची दखल घेऊन. त्यांना श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल व ज्युनियर महाविद्यालयाच्या प्रांगणात हा पुरस्कार देण्यात आला.
सिद्धेश्वर प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करते. पुरस्काराचे हे बारावी वर्ष आहे. यावेळी कारखान्याच्या संचालक , मा.उपध्यक्ष प्रणिती खोमणे, प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल भगत, संस्यापक अध्यक्ष, दत्तात्रय माळशिकारे, संस्थेचे सचिव महेश तांबे, प्राचार्य , मुख्याध्यापक, कोर्हाळे गावचे सरपंच रवींद्र खोमणे, राहुल नाझीरकर, रणजित मोरे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते
COMMENTS