Bhor News l संतोष म्हस्के l कर्नाटकची 'लवंगी' व 'बेडगी' भोरमध्ये दाखल : कमी दराने मिर्चीची विक्री, स्थानिक व्यापाऱ्यांना फटका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात मागील दोन दिवसांपासून कर्नाटक राज्यातील रहिवाशी यांनी विक्रीसाठी घेऊन आलेल्या लवंगी तसेच बेडगी मिरची विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल केली.मात्र कमी बाजारभावाने मिरची विक्री केल्याने स्थानिक व्यापाऱ्याना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
           सद्या उन्हाळा जवळ येऊ लागल्याने तसेच लग्नसराई व शुभकार्य सुरू असल्याने ग्रामीण भागासह शहरी नागरिकांचा मिरची खरेदी करण्याकडे कल आहे.नागरिक वर्षभराचे तिखट फेब्रुवारी मार्च महिन्यात करून ठेवीत असतात.बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांकडे २५० ते २६० रुपये प्रतिकिलो प्रमाणे मिरची विक्री सुरू असताना कर्नाटक राज्यातून भोर शहरात दोन ट्रक (२०० पोती) ५ लाख मिरची विक्रीसाठी आली असून  विक्री रामबाग चौपाटी रोडवर सुरू आहे.ही मिरची २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. भोर शहरातील व्यापाऱ्यांपेक्षा प्रतिकिलो ५० ते ६० रुपये बचत होत असल्याने नागरिकांनी मिरची खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणावर मिरची विक्रीसाठी भोर शहरात आल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडे मिरची खरेदीसाठी ग्राहक फिरकत नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
-------------------
ओली मिरची असल्याने खरेदीदारांचे नुकसान
शहरातील बाजारपेठेतील स्थानिक दुकानदारांकडे सुकलेली मिरची असल्याने २५० रुपये प्रतिकिलो बाजारभाव आहे.सध्या भोर शहरात विक्रीसाठी आलेली परराज्यातील मिरची ही काहीशा प्रमाणात ओलसर असल्याने वजनात वाढ होत आहे.परिणामी मिरची खरेदीदारांचे चाळीस ते पन्नास रुपयांचे नुकसान होत आसल्याचे मिरची खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून सांगण्यात आले.


To Top