सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
विविध विभागातील सेवक वृंद वर्षभर ताण-तणावातून काम करीत असतात.दैनंदिन काम करताना तालुक्यात पूर्णता विविध कार्यक्षम उपक्रम राबवीत तालुका पंचायतचे नाव पुढे जिल्ह्यात उच्चस्थानी नेण्याचे काम होत असल्याने भोर पंचायत समितीचा सेवक वृंद आदर्शवत असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी केले.
पंचायत समिती भोर अधिकारी कर्मचारी स्नेहसंमेलन गुणवंत शिक्षक,कर्मचारी,क्रीडा महोत्सव पुरस्कार समारंभ प्रसंगी शनिवार दि.१७ गटविकास अधिकारी धनावडे बोलत होते.यावेळी जि. प.बांधकाम माजी सभापती कृष्णा शिनगारे,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे,उपगटविकास अधिकारी विजयकुमार धनवटे,बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जयदीप कापसीकर,पशुवैद्यकीय अधिकारी वर्षाराणी जाधव,उपविभागीय अभियंता व्हीं.जी.कुलकर्णी,मिलिंद खोपडे,शिक्षक संघटना अध्यक्ष सुदाम ओंबळे,अग्नीपंख फाउंडेशन अध्यक्ष मोहन आढाव,चांगदेव मसुरकर,पंडित गोळे,शिक्षक पतसंस्था सभापती संपत मळेकर,महेंद्र शिंदे,पोपट निगडे,आप्पा सावंत,आनंदा आंबवले,संजय पवार,महेंद्र शिंदे उपस्थित होते.
धनवाडे पुढे म्हणाले भोर तालुका बांबू पिकवणारा नाही तर बांबू विकणारा असून पंचायत समिती मार्फत भोर येथे बांबू पासून बनविलेल्या विविध वस्तू विक्री केंद्र उभारणार आहे.पंचायत समिती कायमच नवीन विविध उपक्रमांसाठी सेवक वृद्धांच्या जबाबदार कामामुळे जिल्ह्यात अग्रेसर राहीली आहे.