खंडाळा l महिलेच्या विनयभंग प्रकरणी लोणंद पोलीसात एकावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
रस्त्यावरून जात असलेल्या महिलेस चारचाकी गाडी थांबवून तू गाडीत बस तुला पैसे देतो, असे म्हणत विनयभंग करणाऱ्या गोविंद दत्तात्रय धामणकर ( रा. लोणंद,  ता  खंडाळा) याच्याविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि.१९ रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लोणंद सातारा रोडवर गोटेमाळ याठिकाणी लोणंद येथील गोविंद धामणकर याने पिडीत महिला पायी चालत जात असताना तिच्याजवळ चारचाकी गाडी थांबवून तिला गाडीत बस मी तुला पैसे देतो असे म्हणून सदर महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची फिर्याद गोविंद दत्तात्रय धामणकर याच्याविरुद्ध लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आली आहे. सदर घटनाचा तपास लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हावलदार श्री. बनकर हे अधिक तपास करत आहेत.
To Top