सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पनवेल : प्रतिनिधी
बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येते ते म्हणजे विहिघर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके यांचे. त्यांचे आज निधन झाले आहे. १९८७ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेनी राखून ठेवली होती. आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते.