सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलामधील इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक, सायन्स व एम.बी.ए. कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन "सोमोत्सव 2K24" उत्साहामध्ये पार पडला.
यामध्ये साडी डे, टाय डे, मिसमॅच डे, ट्रेंडीशनल डे, स्पोर्टस डे यासह विविध गुणदर्शन व बक्षिस वितरण समारंभाने सोमोत्सवाची सांगता झाली.
सोमोत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणुन बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख म्हणुन आकर्षण अभिनेत्री पल्लवी वैद्य उपस्थित होत्या. या उभयतांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन व संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, मा. चेअरमन व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, संचालक सुनील भगत, श्री. संग्राम सोरटे, ऋषीकेश गायकवाड, प्रविण कांबळे, प्रणिता खोमणे, जितेंद्र निगडे, तसेच संस्थेचे विश्वस्त प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, संस्थेचे सचिव भारत खोमणे तसेच पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य एस. के. हजारे, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. बी. सुर्यवंशी व एम.बी.ए. कॉलेजचे डायरेक्टर डॉ. निलेश लिंबोरे उपस्थित होते. इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय देवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुनेत्रा पवार व अभिनेत्री पल्लवी वैद्य यांचे शुभहस्ते संस्थेच्या सोमेश्वर देवराई मध्ये सोनचाफ्याचे झाड लावुन वृक्षारोपण करणेत आले.
या सोमोत्सवाच्या निमीत्ताने फिशपॉईन्ट, चॉकलेट डे, रांगोळी, फोटोग्राफी, व्हिडीओ ग्राफी, मेहंदी, चित्रकला स्पर्धा अशाप्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. साडी डे, टाय डे आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या दिवशी संपूर्ण शैक्षणिक संकुल विविध वेशभुषांनी सजले होते. प्रत्येक राज्यातील वेशभुषा यानिमीत्ताने पहायला मिळाली.
फुड फेस्टिवलचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, राम जन्म, छत्रपती शिवाजी महाराज, जेजुरीचा खंडोबा, तुळजाभवानी यासारख्या गाण्यामधुन हिंदु संस्कृतीचे दर्शन घडविले त्याचप्रमाणे चंद्रा, अप्सरा यासारखा अनेक नविन गाण्यांमधुन तरूणाई थिरकलेली पहायला मिळाली. सोमोत्सवाचे समन्वयक प्रा. सलोनी शहा, प्रा. शशिकांत वाघ, प्रा. स्वाती नाझीरकर, प्रा. रोहिणी शेंडकर, प्रा. मयुरी यादव यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रतिमा शिंदे, प्रा. चंद्रशेखर भोसले, प्रा. एकता वायाळ यांनी केले.
COMMENTS