सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
फसवणुक करुन नेहलेला अशोक लेलंड कंपनीचा दहा टायर ट्रक क्र एमएच ११ एएल ७५४२ हा दिनांक २१/०९/२०२० रोजी ट्रकवर असणारे थकीत कर्जे भरतो असा करार करुन यातील आरोपी अब्दुल कादीर सय्यद हा घेऊन गेला.
मात्र कर्जाचे दोन हप्ते भरल्यानंतर उर्वरीत कर्ज न भरता सदरचा ट्रक हा परस्पर विकुन टाकला सदरबाबत वाई पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आलेली होती. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा ट्रक हा जामनगर (गुजरात) येथे असल्याची खात्री लायक बातमी प्राप्त होताच वाई पोलीस ठाणेकडील डीबी पथक हे मा. वरिष्ठांचे आदेशाने अधिकच्या तपासकामी जामनगर गुजरात येथे जाऊन तेथे सदर ट्रकचा शोध घेऊन तो जामनगर येथुन ताब्यात घेऊन वाई पोलीस ठाणे येथे आणला आहे.
-------------
सन २०२३ मध्ये फसवणूक करुन नेहलेले सुमारे ७२ लाख रुपये किंमतीचे ट्रक वाई पोलीस ठाण्याच्या तपासपथकाने निरनिराळ्या राज्यातून हस्तगत केलेले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, बी.आर. भरणे पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस हवालदार विजय शिर्के, अजित जाधव, पोलीस अंमलदार पो.शि हेमंत शिंदे पो.शि श्रावण राठोड, पो. शि शिंदे, पो. शि प्रसाद दुदुस्कर, पो.शि कोळी, पो.शि नितीन कदम यांनी केली आहे. पोलीस अधिक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS