Baramati Big Breaking l गुटखा माफीयांवर सर्वात मोठी कारवाई : 'सुपा' येथे तब्बल ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव-सुपे : मनोहर तावरे / दीपक जाधव
पुणे  ग्रामीण पोलिसांनी आज  बारामती तालुक्यात 'सुपा' येथे आज सर्वात मोठी कारवाई केल्याचे समोर आले. एका सराईत गुटखा तस्कराकडून तब्बल 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल छापा टाकून ताब्यात घेतला. याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांनी माध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली.
        
        बारामती तालुक्यातील औद्योगिक वसाहत एमआयडीसी हद्दीत एका गोडाऊनमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी ठेवला जातो. तसेच तो जिल्ह्यातील विविध भागात पुरवठा होत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. आज यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथका मार्फत ही कारवाई करण्यात आली. सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंडवडी येथे एका फार्म हाऊस इमारतीत गुटख्याचा साठा आढळून आला.
         तब्बल 31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सुपे येथे याबाबत माहिती देताना  पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची विशेष टीम तसेच पोलीस उपाधीक्षक दर्शन दुगड सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागनाथ पाटील हे उपस्थित होते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आज करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेले दोन दिवस पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे .या माध्यमातून धडक कारवाई सुरू आहे. ग्रामीण भागातील सर्वच गुन्हेगारी संबंधी माहिती घेऊन कारवाई सत्र सुरू राहणार आहे.
         सविस्तर हकीकत अशी, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अवैद्यरित्या सुरु असलेली विक्रिवर पोलिसांनी छापा टाकुन एका वाहनासह सुमारे ३१ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. ही घटना शनिवारी ( दि. २३ ) बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील विद्युत सबस्टेशन नजीकच्या एका फार्म हाऊसवर घडली. यामध्ये एका गुटखा माफियास अटक करण्यात आली आहे. सुपे पोलिस स्टेशनंतर्गत ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे या गुटखा माफियांच्या रॅकेटचा निश्चित पर्दाफास होईल असे सर्वसामान्यांकडुन बोलले जात आहे.  
        प्रशांत धनपाल गांधी ( वय ४८ रा. लासुर्णे ता. इंदापुर सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट प्लॅट नं १ पेन्शील चौक बारामती ) असे अटक केलेल्या गुटखा माफियाचे नाव आहे. 
             पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील औद्योगिक वसाहत एमआयडीसी हद्दीत एका गोडाऊनमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी ठेवला जातो. तसेच तो जिल्ह्यातील विविध भागात पुरवठा होत असल्याची माहिती सहायक पोलिस अधिक्षक दर्शन दुगल व त्यांच्या टिमला गुप्तहेरांकडुन  मिळाली होती. त्यानुसार प्रशांत यांच्या घराची झडती घेतली असता मुद्देमाल मिळुन आला नाही. त्यानंतर कसुन चौकशी केली असता कर्नाटक मधील विजापुर येथील निसार ( पुर्ण नाव माहिती नाही ) यांच्याकडुन विक्रीसाठी आणलेला गुटखा यवत येथील राहुल मलबारी यास देण्याकरीता जात असताना वाहन रस्त्यात नादुरुस्त होवुन बंद पडले. त्यामुळे उंडवडी येथील स्वमालकीच्या फार्म हाऊसवर गुटखा  ठेवल्याची माहिती गांधी याने दिली. त्यानंतर सहायक पोलिस अधिक्षक दर्शन दुगल, सुप्याचे सहायक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या टिमने छापा टाकल्यावर एका पिकअप वाहनासह ३१ लाख किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. 
      दरम्यान प्रशांत, निसार आणि राहुल मलबारी आदी गुटखा माफियावर पोलिसांनी  गुन्हे दाखल केले. तर प्रशांत यास ताब्यात घेवुन रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास बुधवार ( दि. २७ ) पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आज करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. 
       पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, बारामती विभाग, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक दर्शन दुगड, सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश घोडके, जिनेश कोळी, लेंडवे, म. प्रौ. उपनिरीक्षक देशमुख, पो. हवा काळे, पो. कॉ. इगवले, पो. कॉ. तुषार ढावरे, सुदर्शन डोळाळकर आदींनी मिळुन ही कारवाई केली. अधिक तपास सहा. पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील करित आहेत. 
            ......................................
To Top