सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी ता.भोर येथील गावानजीकच्या विहिरीजवळ कोल्हा जंगलातून रात्रीच्यावेळी पाण्याच्या शोधार्थ आला असता त्याचा तोल जाऊन कोल्हा विहिरीत पडला असल्याची घटना रविवार दि.२४ घडली. कोल्ह्याला वाचवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी व बाजारवाडी ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
सद्या रब्बीतील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतात काम करण्यासाठी गेलेले शेतकरी दादा यादव यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे लक्षात आले. तात्काळ शेतकरी यादव यांनी वनविंभागाला कळविले.विहिरीतील पाण्यात पडलेला कोल्हा घाबरलेल्या अवस्थेत असून वनविभागाचे बचाव पथक (कर्मचारी )तसेच बाजारवाडी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत.कोल्ह्याला विहिरीतील पाण्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कोल्ह्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी यांनी दिली.
COMMENTS