सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : मनोहर तावरे
बारामती तालुक्यात सध्या एका नव्या व्यवसाय मुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आहे. शासनाकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी घरगुती टाक्यांमधून गॅस भरण्याचा प्रकार उघड झालाय. ‘मुर्टी’ गावाजवळ काल रात्री उशिरा वडगाव- निंबाळकर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केलीय.
वडगाव- निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या अनेक वर्ष हा गैरव्यवसाय सुरू होता. जलद श्रीमंत होण्याच्या दृष्टीने काही तरुण बेरोजगार तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले प्रतिष्ठित या व्यवसायात नव्याने सक्रिय आहेत. तालुक्यातील काही गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींकडून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर खरेदी केले जातात. हेच सिलेंडर विविध कंपन्यांच्या कमर्शिअल- व्यावसायिक टाक्यांमध्ये भरून ते पुणे सह मोठ्या शहरात अनधिकृत पणे पुरवले जातात.
या नव्याने कार्यरत असलेल्या व्यवसायात तालुक्यातील एक मोठी गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे. गेल्याने वर्ष हा व्यवसाय सुरू असला तरी शासनाचे काही विभाग व पोलीस प्रशासन यांच्याशी ‘अर्थपूर्ण’ तडजोड असल्यामुळे कारवाई होत नव्हती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं:- 201/2024 भा द वी 285,286,34,अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 नुसार फिर्याद रविद्र दशरभ पारधी पुरवठा निरीक्षक बारामती यांनी दाखल केली आहे.
शनिवारी रात्री उशिरा या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी दर्शन दुगड भा.पो.से हे करीत आहेत .