सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनामार्फत परदेशात उच्च शिक्षणासाठी विश्वजित भालचंद्र होळकर यास शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.
या संबधाने महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या प्रवर्गातील गुणवंत मुला मुलींना सन 2023-24 मध्ये परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या 12 मार्च 2024 रोजीच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली असून यामध्ये पुणे जिल्हयातील एकूण 4 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. यामध्ये बारामती तालुक्यातून विश्वजित भालचंद्र होळकर याचे नावाचा समावेश आहे. हा गुणवंत विद्यार्थी RWTH Aachen University, Germany येथे एमएससी उच्च शिक्षणासाठी गेलेला आहे. तो श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे लीगल ऑफिसर भालचंद्र होळकर यांचा मुलगा आहे. एका साखर कामगाराच्या मुलाने मिळवलेल्या यशाने परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
COMMENTS