सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुणे सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणाहून नगरकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीच्या गाड्या जवळचा मार्ग असल्याने नीरा मोरगाव रोड चा वापर करतात.
या ठिकाणाहून एमआयडीसी कडे जाणारा कच्चामाल तसेच शिर्डी, शनिशिंगणापूर या देवस्थाना जाणारे भाविक या मार्गाचा वापर करतात तसेच मुर्टी मोरगाव येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे येणारा ऊस याच रस्त्याने आणतात. यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते आत्ताच निरेपासून मोरगाव पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या रोडवरती वाहनांची वर्दळ वाढलेली आहे विशेषता वाहनांचा प्रवास रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात असल्यामुळे नीरा नजीक जगताप वस्ती येथील निरा डाव्या कालव्यावरचा पूल कॉर्नर मध्ये असल्यामुळे आणि या पुलाच्या जवळ स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनांना या कॉर्नरचा अंदाज येत नाही यामुळे येथे अपघातांची मालिका मोठ्या प्रमाणात झालेली आपणास दिसते गेल्या वर्षभरात या ठिकाणी याच कॉर्नर नजीक मोठे अपघात झाले आहेत यामध्ये काहींना शारीरिक इजा तर काहींनाआपला जीव देखील गमवावा लागला आहे यामुळे या रोडच्या कडेला लोकवस्ती असल्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागते रात्रीच्या वेळी कोणत्याही गाडीचा अपघात होण्याची शक्यता आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे काल रात्रीच घडलेल्या अपघातामध्ये गुळूंचे नदी कर्नलवाडी येथील युवकाचा यामध्ये अपघाती मृत्यू झाला आहे यामुळे येथील ग्रामस्थांनी नीरा डाव्या कालव्याच्या पुला नजीक दोनही बाजूला स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे नीरा शहर राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांनी स्पीडब्रेकर न बसवल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी दिला आहे
COMMENTS