Baramati News l घराणेशाहीच्या विरोधात मी निवडणूक रिंगणात : मा. राज्यमंत्री विजय शिवतरे : मोरगावच्या मयुरेश्वराचे घेतले दर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम
मोरगाव : मनोहर तावरे
गेली अनेक वर्ष बारामतीच्या जिरायती भागात शेती सिंचनाचा प्रश्न कायम आहे. शहराचा विकास केला म्हणजे संपूर्ण मतदारसंघात सुधारणा झाली नाही. असा आरोप करत घराणे शाहीच्या विरोधात जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवीत असल्याचे माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी आज मोरगाव येथे बोलताना सांगितले.

   पवार कुटुंबात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असलेली स्पर्धा व त्यांची मानसिकता याविषयी शिवतरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. येणाऱ्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी केली असल्याचे यावेळी सांगितले. केवळ सत्तेचे राजकारण करीत या पवार कुटुंबीयांनी मतदारांची दिशाभूल केली असा आरोप यावेळी माजी राज्यमंत्री शिवतारे यांनी केला.

   आज प्रथम महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे खंडेरायाचे दर्शन घेऊन शिवतारे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले. हा हा श्रींचा अभिषेक व पूजा आरती करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा ताई तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मतदान न करता जनतेचा पर्याय म्हणून मला संधी द्यावी अशी मागणी त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
To Top