Baramati News l मनोहर तावरे l बारामतीचे गट शिक्षणाधिकारी ‘केअरलेस’? एस.एस.सी बोर्ड परीक्षा कामकाज ‘राम भरोसे’

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 मोरगाव  : मनोहर तावरे 
प्रगतीच्या नावाचा लौकिक असलेल्या बारामती तालुक्यात ही स्थिती आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागातील अनेक शैक्षणिक उपक्रम केवळ नामधारी आहेत. शासनाच्या वतीने यासाठी नियंत्रण करणारे तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हे केअरलेस असल्याची चर्चा जाणकार लोकांकडून सुरू आहे. याबाबत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
           राज्यात सध्या एसएससी बोर्ड परीक्षा सुरू आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर (उत्तर पत्रिका) सर्वच शाळा महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवले जातात. यासाठी परीक्षा मंडळाच्या वतीने एक नियमावली निश्चित केलेली आहे. यानुसार उत्तर पत्रिकांची तपासणी आवश्यक आहे .अनेक शाळा महाविद्यालयातून मात्र यासाठी सोईस्कर हलगर्जीपणा केला जातो. शासनाच्या सेवेत कायम नसलेल्या व हंगामी तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक शिक्षकांकडून या उत्तर पत्रिका तपासणी करून घेतल्या जातात.
    या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका शाळेच्या दैनंदिन वेळेत आणि शाळेतच संबंधित प्राचार्य यांच्या संरक्षित ठिकाणी असणे आवश्यक आहे. तसेच यासाठी विशिष्ट रजिस्टर ठेवून यामध्ये नोंदी करणे आवश्यक असते. परंतु प्रत्येक्ष मात्र; या उत्तर पत्रिका अनेक शिक्षक स्वतःच्या सोयीनुसार व घरी नेऊन तपासणी करत असल्याचे समोर आले आहे. एकूणच संपूर्ण व्यवस्थेवर शासनाचे नियंत्रक म्हणून गटशिक्षणाधिकारी हे ओळखले जातात. परंतु याबाबत मात्र ते संवेदनशील नसल्याचे समोर आले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर टाळाटाळ केली जात असल्याने वरिष्ठ ने दखल घ्यावी अशी मागणी आहे.
To Top