सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार सुपे ( ता. बारामती ) येथील जेष्ठ पत्रकार जयराम मारुती सुपेकर यांना नुकताच प्राप्त झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा समाजकल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई मधील नरीमन पॉईंड येथील जमशेदजी भाभा नाट्यगृहामध्ये या पुरस्काराचे वितरण येत्या १२ मार्चला करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सुपेकर यांना समाजकल्याण विभागाच्यावतीने सामाजिक कार्याबद्दल सन २०२२ - २३ चा हा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
करोनाच्या काळात पुरस्कार वितरणसाठी खंड पडला होता. त्यानंतर प्रथमच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील सन २०१९ ते २०२३ पर्यंतच्या कालखंडातील सुमारे २४ जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये अनेक संस्था, व्यक्ती यांना हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती बारामती येथील समाजकल्याण विभागाचे अधिक्षक अमोल भालके यांनी दिली.
........................................
COMMENTS