Baramati News l डॉक्टरानेच केले परिचारिकेवर लैंगिक अत्याचार : बारामती पोलिसात डॉक्टरवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
तुझ्याबरोबर लग्न करतो असे सांगून दूधसंघ सोसायटी व जंक्शन येथे वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका ३४ वर्षीय परिचारिकेने बारामती पोलिसात एका डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली आहे. 
       यावरून बारामती पोलिसांनी डॉ. प्रदिप शिंदे देवकाते हॉस्पिटल बारामती जि.पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत सविस्तर हकीकत अशी,  २० जुलै २०२३ ते ३ मार्च २०२४ दरम्यान आरोपीने दुधसंघ सोसायटी व जंक्शन येथे डॉ. प्रदिप शिंदे रा. दुधसंघ सोसायटी ता. बारामती जि.पुणे याने वेळोवेळी फिर्यादीस तुझ्या बरोबर लग्न करतो असे सांगीतले व त्याचे राहते घरात अडकवून ठेवुन तु जर या बद्दल कोनास काही सांगीतले तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी देवुन फिर्यादीवर अत्याचार करुन फिर्यादीवर तीचे मनाविरुध्द शारीरीक संबंध करुन दमटाटी केली आहे. पुढील तपास मपोसई देशमुख करत आहेत.
To Top