Bhor News l भोरला साडेचार किलो गांजा जप्त : एकावर भोर पोलिसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर महाड रोडच्या डाव्या बाजूस संजय नगर परिसरात ४ किलो ५०० ग्रॅम ४५ हजार रुपये किमतीचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला भोर पोलिसांनी कारवाई करत जप्त केला.
        भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि.५ रात्रीच्या वेळी भोर-महाड रस्त्यावरील संजय नगरकडे जाणाऱ्या पडक्या इमारती जवळ अजय किसन गुमाने वय -२१ वर्ष रा.अनंतनगर झोपडपट्टी, भोर याने स्वतःचे फायदया करता तयार वाळलेला उग्र वासाचा गांजा विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगला असताना मिळून आला.गुमाने याला गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलमाखाली करण्यात आली.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अण्णा पवार, उपनिरीक्षक श्रीकांत जाधव महिला पोलीस उपनिरीक्षक शिला खोत,पोलीस हवालदार उद्धव गायकवाड,विकास लगस ,दत्तात्रय खेंगरे,अविनाश निगडे, गणेश कडाळे, सागर झेंडे, पोलीस प्रियांका जगताप यांच्या पथकाने केली.
To Top