सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या महुडे खोऱ्यातील शिंद रस्ता ते गवडी ता.भोर गावापर्यतच्या रस्त्याचे काम न करता परस्पर पैसे काढुन घेतल्याने सदरचा रस्ता चोरीला गेला असुन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिळीमकर व ग्रामस्थांनी निवेदन देऊन मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
पञकार परिषदेत माजी सरपंच एकनाथ शिळीमकर व निखिल राजेशिर्के,बाप्पा साळुंके,चंद्रकांत कुमकर दिलीप साळुंके,सुदाम साळुंके व ग्रामस्थांनी निवेदन देवून माहिती दिली. गवडी येथील गवडी ते प्रजिमा १४२ मार्ग सा.क्र. ० ते १(ग्रामा ४४) या रस्त्याचे कामकाज करण्याबाबत निविधा शासनाने केली असता. (४/०१/२०२२) हे काम रक्कम १३,३३,०५७ एवढ्या रूपयाचे होते. ह्या कामासाठी ठेकेदार म्हणून ग्रामपंचायत गवडी,ता. भोर हे आहेत.परंतु सद्य परिस्थिती पाहता गवडी ते प्रजिमा १४२ मार्ग सा.क्र. ० ते १ (ग्रामा ४४) या रस्त्याचे कामच झाले नाही.परंतु या कामाचे ठेकेदार ग्रामपंचायत गवडी व विद्यमान सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य यांनी बांधकाम विभाग यांच्याशी संगणमताने रस्त्याचे काम न करता रक्कम १३,३३,०५७ रुपये हडप केली असुन चौदा लाखांचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी गवडी येथील सरपंच व सदस्यांनी राजीनामा देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.बांधकाम विभागाकडुन कामाची पाहणी करुन १५ दिवस झाले तरी अदयाप अहवाल दिलेला नसुन प्रशासन कारवाई करण्यास टाळटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.तर गवडी गावात जाणारा रस्त्याबाबत विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत.आम्ही कोणतेही काम न करता निधी घेतलेला नाही.त्या कामाची वर्क ऑर्डर व अंदाज पत्रक ग्रामपंचायतीचा ठराव आहेत.जीपीएस लोकेशन मधील काम केल्याचे फोटो आहेत.विरोधकांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत असे सरपंच गवडी काशिनाथ साळुंखे यांनी सांगितले.गवडीतील रस्त्याच्या कामाबबत ग्रामस्थांचे निवेदन आले असुन रस्त्याचे काम झालेले आहे किंवा नाही याची स्थळ पाहणी करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला दिल्या असुन कामाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांनी सांगितले.