सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील नामवंत असलेल्या कुस्ती संकुलनातील प्रशिक्षकाने मुलीस कुस्तीमध्ये करिअर घडवून लग्नाचे आमिष दाखवत संकुलातील एका मुली सोबत शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण केल्याची घटना घडली.याबाबत संकुलातील प्रशिक्षक आरोपी याला भोर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान मौजे भोर, महाबळेश्वर हॉटेल रेनफॉरेस्ट,(जि.सातारा ) येथील परिसर या ठिकाणी फिर्यादी २१ वर्षीय पिडीत मुलीस आरोपी सुनिल विठ्ठल शेटे (वय-५३, रा. संजयनगर भोर, ता. भोर ) याने फिर्यादी सोबत लग्न करणार आहे.तुझे कुस्तीमध्ये करीयर घडवतो असे अमिष दाखवुन तीचे सोबत मोबाईलवर संपर्क ठेवुन तीला चारचाकी गाडीतुन भोर येथील कुस्ती संकुल येथे घेवुन येताना - जाताना वेळो वेळी मिठी मारून तीचा किस घेवुन तीचा विनयभंग, छेडछाड केली. तीला महाबळेश्वर येथील हॉटेल रेनफॉरेस्ट व सातारा जिल्हा हायवे रोडलगत येथील लॉजवर नेवुन तीचेवर जबरीने वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले.तसेच सदर प्रकार कोणास सांगीतले तर तुझे करीयर बरबाद होईल अशी धमकी दिली.फिर्यादी वरून आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीस भोर पोलीसांनी तात्काळ अटक केली. पुढील तपास अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.
COMMENTS