शाब्बास भले.. l मिनल कांबळे l राष्ट्रीय ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत 'राजगड'च्या 'राजतोरण'चा वल्लभ चमकला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड ; मिनल कांबळे 
नुकत्याच नोयडा उत्तर प्रदेश येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 92 किलो फ्री स्टाईल मध्ये राजगड तालुक्यातील राज तोरण कुस्ती संकुल मधील पैलवान वल्लभ शिंदे यास ब्राँझ पदक मिळवून राजगड तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवले, 
      याबद्दल संपूर्ण तालुक्यातील त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे या अगोदर देखील पैलवान वल्लभ शिंदे याने लातूर येथे झालेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे मधे सुवर्ण कामगिरी करुन सुवर्ण पदक विजेता झाला, सध्या राजतोरण कुस्ती संकुल विंझर येथे वल्लभ सराव करीत असुन माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर वस्ताद राजाभाऊ लिम्हण वस्ताद  अंकुश दसवडकर,सतीश लिम्हण, केवल भिंगारे, काळुराम जगताप,अनिकेत व्यवहारे,विनायक लिम्हण, विक्रम जगताप यांचे त्यास मार्गदर्शन करीत आहेत.


To Top