सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या हद्दीला लागून असलेल्या खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील जनावरांच्या गोठ्याला सोमवार दि. सकाळी ११ च्या सुमारास आग लागल्याने गोठ्याशेजारील प्लायवूड तसेच इतर साहित्य जळून खाक झाले तर गोठ्यातील ७० पैकी २ म्हशी आगीच्या जाळाने किरकोळ भाजल्या.
जनावरांच्या गोठ्या शेजारील माळरानाला आज्ञाताने लावलेल्या वनव्यामुळे म्हशींच्या गोठ्याशेजारील प्लायवूड तसेच इतर किरकोळ साहित्याने पेठ घेतला.आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने आगीच्या ज्वालांमुळे गोठ्यातील दोन म्हशी भाजल्या गेल्या.कान्हवडी ग्रामस्थ तसेच तरुणांनी आगीचे वृत्त समजतात तात्काळ सावधानता बाळगीत आग विझवण्याचा जिक्रिने प्रयत्न केला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.