सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील आठ ते दहा गावांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींचे विद्येचे मंदिर असलेल्या पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे ता.भोर च्या १९९४-९५ दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि.१० पार पडला.स्नेह मेळाव्यात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी २९ वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवनींच्या गप्पांमध्ये रंगून जात आठवणींना उजाळा दिला.यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले गेले.
वीसगाव खोऱ्यातील पंचक्रोशी आदर्श विद्यालयात नेरे,आंबाडे,बालवडी,वरवडी (खुर्द, डायमुख, बुद्रुक), पाले, पळसोशी, गोकवडी, निळकंठ, जेधेवाडी, पोळवाडी, धावडी, बाजारवाडी येथील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी शासकीय नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत.दुर्गम डोंगरी भागातील या इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यालयात ५७ वर्षांच्या कालावधीत शेकडोहून अधिक गुरुजनांनी विद्यार्थ्यांना शिक्षण विद्या देण्याचे काम केले आहे.गुरुजनांची तसेच माजी शैक्षणिक काळातील सवंगड्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी १९९४-९५ दहावी बॅचचा स्नेहमेळावा आयोजित केला गेला होता.स्नेह मेळाव्याप्रसंगी शेकडो माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहून शालेय जीवनात वेगवेगळे घडलेले किस्से एकमेकांमध्ये गप्पा गोष्टींच्या माध्यमातून सादर केले गेले.विद्यार्थी पाच ते सहा तास जुन्या आठवणींमध्ये रमून गेले होते.यावेळी हयात नसणारे २ गुरुजन तसेच ३ विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी ॲड.सुवर्णा बदक,सारिका खोपडे,नंदा वरे,विजय तुपे ,कालिदास भिलारे ,काशिनाथ भिलारे ,सुनील पोळ,शिवाजी म्हस्के ,अमर उभे, संदीप खोपडे,भगवान चव्हाण,राजू खोपडे ,संतोष म्हस्के ,विठ्ठल म्हस्के,सुनील म्हस्के,विजय चव्हाण, ज्ञानेश्वर गोळे उपस्थित होते.