Baramati News l लालासाहेब जाधव यांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील  मोरगाव  येथील  लालासाहेब नामदेव जाधव यांना  राज्य शासनाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दि. ८ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयाद्वारे घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

मोरगाव ता. बारामती येथील लालासाहेब जाधव  महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई येथून अवर सचिव  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे येथे प्रकल्प संचालक म्हणून शासकीय सेवा केलेली आहे. शासकीय सेवा करीत असताना देखील प्रशासकीय सेवेबरोबर समाजकार्यात जाधव यांन वाहुन घेतले आहे.  महाराष्ट्र राज्य कैकाडी  समाज संघाचे अध्यक्ष पदावर काम पाहत असताना  लालासाहेब जाधव  यांनी  राज्यातील कैकाडी समाजाला त्याचप्रमाणे वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी  बार्टी, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांच्याशी सतत पाठपुरावा करून, संबंधित अधिकारी आणि मंत्री महोदय, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया, नवीदिल्ली यांच्याशी बैठका घेऊन न्याय मिळविण्यासाठी  सकारात्मक प्रयत्न केला आहे.

 एवढेच नव्हे तर अनेक समाजउपयोगी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.त्याचप्रमाणे  लालासाहेब जाधव यांनी वंचित समाज,विमुक्त जाती व भटक्या जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या मागासवर्गीय प्रवर्गासाठी देखील  उल्लेखनिय काम केले आहे. जाधव यांच्या समाज कार्याची  दाखल घेऊन महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी श्री लालासाहेब जाधव यांची सन 2022 - 2023 सालासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आली आहे.
        लालासाहेब जाधव यांना देण्यात येणारा समाज भूषण पुरस्काराचे वितरण मंगळवार, दि. १२  मार्च रोजी जमशेठजी भाभा नाट्यगृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री, अजित  पवार यांच्या  उपस्थितीत होणार आहे.  मोरगाव परीसरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पहील्याच व्यक्तीस हा पुरस्कार मिळाला असल्याने जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
To Top