Bhor News l नेरेत अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेल्या वणव्यात शेती पिकाचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील नेरे ता.भोर येथील शेतकरी दत्तात्रय जगन्नाथ बढे यांच्या शेतात शेजारील  खाजगी रानात अज्ञाताने लावलेल्या वनव्यात शेती पीक ,ड्रीप पाईप व कळकाच्या काठ्या जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे ४० हजाराहून अधिक नुकसान झाले.
            दत्तात्रय बढे यांच्या शेताशेजारील पठारावर (लाकड्यात) कोणीतरी आज्ञातांनी वनवा लावला होता.वणवा वाऱ्याने शेतातील पिकाकडे आल्याने अचानक ज्वारीची काढणी करून तीन पोती कनसाची, एक एकर साठी आणलेली ड्रीप पाईपलाईन तसेच बांधावर ठेवलेली सातशे कळकाच्या काठ्या पूर्णपणे वळव्यात जळून खाक झाल्या.वनवा विझवण्यासाठी नेरे ग्रामस्थ तसेच तरुण मारुती बढे ,मयूर मैंद,नामदेव बांदल, महेश कदम, अभिजीत सावले यांनी कसोशीने प्रयत्न केला मात्र वनवा विझवण्याच्या अगोदरच शेती वस्तू जळून गेल्या होत्या. शेती वस्तू जळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने वीसगाव खोरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाकडून वनवे लावू नयेत असे आव्हान केले जात असतानाही अज्ञातांकडून वनवे लावले जात असल्याने डोंगररांगांमधील वनसंपदा तसेच वन्यप्राणी, पशुपक्ष्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत आहे.
To Top