बारामती l सोमेश्वरनगर येथे १०० बेडचे शासकीय रुग्णालय उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याने जागा उपलब्ध करून द्यावी. जागा उपलब्ध झाल्यानंतर सोमेश्वरनगर येथे १०० बेडचे शासकीय रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. या अगोदरचे येथील मंजूर झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र रद्द होणार असून बारामतीच्या सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाप्रमाणेच सोमेश्वरनगर येथे रुग्णालय उभे राहणार असल्याने या ठिकाणच्या नागरीकांच्या आरोग्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.

              सोमेश्वरनगर ता. बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. यावेळी विश्वासराव देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नेते शहाजीराव काकडे, सोमेश्वरचे ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, यांच्यासह नीता फरांदे, प्रणिता खोमणे, विक्रम भोसले, प्रशांत काटे, सुनिल भोसले, करंजेपुलच्या सरपंच पूजा गायकवाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. बारामतीच्या इतिहासात प्रचंड एवढा मोठा विकास निधी तालुक्याला मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला काहीजण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार निवडून द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महायुतीचे सरकार विकास कामांना प्राधान्य देत आहे. केंद्रातील मोदी सरकारने ८० कोटी गरिबांना मोफत धान्य वाटप केले. राज्य सरकारने गोरगरीब महिलांना साड्या वाटप केले. समाजातील विविध घटकांसाठी सारथी, महाज्योती, बार्टी या संस्था निर्माण केल्या आहेत. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ केली आहे. रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा निधी तसेच पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जल जीवन मिशनच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी मागील काळात घेतलेला ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाला पाच रुपये अनुदान देण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद महामंडळाचे कर्ज मर्यादा वाढविली आहे. जिरायती भागाला पाणी देण्यास प्राधान्य देत आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजनेप्रमाणेच राज्यशासन हे ओबीसी- मराठा समाजातील गरीब कुटुंबासाठी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आडसाली ऊसाचा अंदाज चुकल्याने सोमेश्वर अजूनही आडसाली उसाचे गाळप करू शकला नाही मात्र निरा डाव्या कालव्याला जूनपर्यंत पाणी राहणार असल्याने शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आवाहन अजित पवार यांनी केले.

 ------------------ 

बारामती ते फलटण रेल्वे सेवा सुरू करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दिला असून लवकरच बारामती- फलटण रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. रेल्वेचा फायदा दोन्ही तालुक्यातील जनतेला होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

To Top