सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बु : प्रतिनिधी
प्रत्येकाचा एक काळ असतो. उमेदीच्या काळातच कामे होत असतात. विकास फक्त मीच करू शकतो. उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे असे शरद पवार यांचे नाव न घेता टोला लागावत कुणी भावनिक केले तर त्याला बळी न पडता मी देईल तो खासदार विजयी करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले.
आज गुरुवारी अजित पवारांनी बारामती तालुक्याचा मॅरेथॉन दौरा केला. यावेळी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा दहा हजार कोटींचा आयकर मोदी - शहांनी माफ केला. शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. दूधाला अनुदान दिले. पोलीस पाटील, आशा सेविकांचे मानधन वाढवले. साडे आठ लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. मी तुमच्यासाठी जीवाचे रान करतोय. मी जर नसतो तर उन्हाळयात नीरा डावा कालव्याला पाणी मिळाले नसते. माझ्या सारखा विकास कुणीच करू शकत नाही. ही निवडणूक वेगळी आहे. तुम्हाला फोन येतील मात्र अशा वेळी भावनिक एन होता विकासाच्या मागे उभे रहा. सत्तेत राहून भले करायचे की विकासाला खीळ घालायची हे तुम्हीच ठरवा. सर्वांनी गट तट विसरून मी देईल तो उमेदवार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगावचे अध्यक्ष केशव जगताप, बारामती दूध संघाचे अध्यक्ष पोपट गावडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, कोऱ्हाळेचे सरपंच रवींद्र खोमणे उपस्थित होते.