सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पाचगणी : सचिन भिलारे
पांचगणी पोलीस ठाणे हद्दीत नविन बांधकाम चालु असलेल्या व बंद बंगल्यांचे चालु फिटींगमधिल वायर काढुन घेणे बाबत घरफोडी व चोरी सारखे गुन्हे दाखल झाले होते.
सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल, उपविभागिय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, बाळासाहेब भालचीम यांनी दिले. सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरुन पांचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक व तपासी पोलीस अंमलदार पवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार शिंदे व पोकॉ लोखंडे यांनी सदर घडणा-या गुन्हयाबाबत गोपनीय खब-यामार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केले आहेत. ओकार संतोष राजपुरे, विशाल सुरेश आडागळे, सागर निलेश वैराट, दिपक नथुराम गोळे यांना अटक केली आहे. तर
रुषी वाडकर हा फरार आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल, उपविभागिय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई बाळासाहेब भालचीम मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक व वासी पोलीस अंमलदार पोहवा/ पवार यांनी आरोपी यांचेकडे चौकशी करुन चोरीस गेलेला माल हस्तगत केला आहे. तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोउनि ननवरे, पोहवा पवार, पोना शिंदे व कॉ लोखंडे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला.