Bhor News l संतोष म्हस्के l शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले : मात्र साथीच्या आजाराने कष्टाचे चीज झाले नाही

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील दुर्गम डोंगरी आंबाडे ता.भोर येथील शेतकऱ्याने शेतीला जोड म्हणून गावरान शंभर कोंबडे व कोंबड्यांचे कुक्कुटपालन केले होते.कुक्कुटपालन शेडमधील पन्नासहुन अधिक गावरान कोंबड्यांचा संसर्गजन्य         ( मरमरी) साथीच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.१९ घडली.
          ग्रामीण भागात शेतीला जोड व्यवसाय म्हणून घरोघरी कोंबड्या पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. आंबाडे ता.भोर येथील बेरोजगार तरुण शेतकरी विजय बबन बांदल यांनी शेतीपूरक कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. कुक्कुटपालनात शंभर कोंबडे व कोंबड्यांचे मागील सहा महिन्यांपासून पालन केले गेले. सध्या या कुक्कुटपालन शेडमधील कोंबडे व कोंबड्या विक्री योग्य झाल्या होत्या.मात्र सद्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातील अतिउष्णता तसेच साथीच्या आजाराने शेड मधील ३० कोंबडे व २० कोंबड्या यांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे ३५ हजाराहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी वीसगाव खोऱ्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
----------------
कष्टाचे चीज झाले नाही
 सुशिक्षित बेरोजगार असल्याने अनेक वर्षांपासून शेती हा व्यवसाय करीत होतो. शेतीला पूरक असा व्यवसाय असावा म्हणून १०० गावरान कोंबड्यांचे कुक्कुटपालन शेड उभारले. सहा ते सात महिन्यांपासून अपार कष्ट करून शेडमधील कोंबड्यांना मोठे करण्याचे काम केले. कोंबड्या विक्री योग्य झाल्या असताना अचानक साथीच्या आजाराने घाटल्याने कुक्कुटपालन शेडमधील ५० हून अधिक कोंबड्या मृत्त पावल्या.अपार कष्टाचे चीज झाली नाही असे शेतकरी विजय बांदल यांनी सांगितले.
                                      
To Top