जावली l तालुक्यात एका महिलेची गळफास घेऊन तर एका पुरुषाची विष पिऊन आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील केंजळ व सोनगाव येथील अनिता सुरेश केंजळे वय अंदाजे ४३ यांनी गळफास घेऊन व अभिजीत तानाजी शिंदे वय ३६ याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून मेढा पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.

          याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार केंजळ येथील अनिता सुरेश केंजळे वय अंदाजे ४३ हीने घरातील लाकडी तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असलेबाबतची खबर आरती अशोक केंजळे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे असून दुसऱ्या घटनेमध्ये सोनगाव येथील अभिजीत तानाजी शिंदे ( वय ३६ ) हा पुणे येथे पीएमटी बसवर चालक म्हणून काम करत होता. चार दिवसापूर्वी तो गावी सोनगाव येथे आला होता. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे चार दिवसापासून अभिजीत हा दारूच्या नशेत होता. त्यातच त्याने विषारी औषध प्राशन करून  आत्महत्या केल्याची खबर उत्तम नारायण शिंदे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय शिंदे करीत आहेत.
To Top