सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भाटघर धरणाच्या उत्तर दिशेला कुरुंजी तर दक्षिण दिशेला पांगारी (ता.भोर) या दोन गावात आश्रमशाळा असुन शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील पटसंख्या अभावी चारही वर्ग बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.कुरुंजी व पांगारी येथील चौथीपर्यंत आश्रम शाळा बंद होणार असल्याने परिसरातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.
कुरुंजी तसेच पांगारी आश्रम शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षणासाठी परिसरातील अनेक मुले येत असतात.अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आश्रम शाळा अचानक बंद पडल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षणाची गैरसोय होणार आहे.आश्रम शाळांमध्ये दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थी येत असतात.काही गावांमध्ये विद्यार्थ्यांना तर डोंगररांगांमधून पायपीट करत शाळेत जावे लागते. शाळा बंद होणार असल्याच्या माहितीने पालक वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.दरम्यान काही गावांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना शासनाने घेतलेला हा निर्णय मान्य नसून वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे.२०१८-१९ ला मध्ये कमी पटाच्या तालुक्यातील आठ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमदार संग्राम थोपटे यांनी शासनाला दुर्गम डोंगरी भागातील अडीअडचणी समजून सांगितल्याने शासनाच्या शाळा बंद केल्या नव्हत्या. दुर्गम डोंगरी भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने घेतलेला निर्णय माघार घ्यावा असे पालक वर्गातून बोलले जात आहे.