सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : ओंकार साखरे
गरीबांचा कैवारी आणि समाजाच्या अडीअडचणीना मदत करण्यासाठी धावणारे समाजाभिमुख असलेले ओझरे ता. जावली येथिल माजी सभापती मानसिंगराव मर्ढेकर (आण्णा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने तालुक्यातील निस्वार्थी, निर्व्यसनी, भ्रष्टाचार मुक्त आणि पुर्णव सितांचा नेता हरपल्याने तालुक्यात शोककळा पसरली असून अनेक राजकिय, सामाजिक जनतेच्या उपस्थितीत वेण्णा तीरावर अखेरचा निरोप देण्यात आला.
मानसिंगराव मर्ढेकर हे समाजातील तळागाळापर्यंत पोहचलेला नेता आण्णा नावाने प्रसिद्ध होता. जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारकिर्द घालविली असताना पंचायत समितीच्या सभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गोरगरीबांची कामे केली. राजकारणात कॉग्रेस पक्षाचे शिलेदार म्हणून त्यांचेकडे पाहिले जायाचे. एकच पक्ष निष्ठा ठेवून कधीही भ्रष्ट न झालेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायाचे.
कण्हेर धरणाचे पुर्नवसन प्रश्न असो कि कोयना पुर्नवसन असो , सत्ता असो किंवा नसो कधी ही एक रुपयाची अपेक्षा न करता समाजासाठी झटणारा नेता म्हणून आण्णांची ओळख असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांच्या तोंडून उद्दागारली जात होती. समाजातील प्रत्येक पुर्नवसीत व्यक्तीचे पुर्नवसन होत नाही तोपर्यंत आण्णांनी शासनाचे बुडीत क्षेत्राचे स्वतःचे पैसे घेतले नाहीत अगर जमिन मिळण्यासाठी लागणारी पासष्ट टक्के रक्कम शासनास भरली नाही कारण प्रत्येक गरीबाचे काम पूर्ण व्हावे हिच आण्णांची असावी असे श्रध्दांजली वाहताना अनेकांनी सांगुन आण्णांचे अपूर्ण राहीलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असा संकल्प यावेळी अनेकांनी बोलुन हीच खरी श्रध्दांजली आण्णांना होईल अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
आण्णांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, माजी आ. सदाशिवभाऊ सपकाळ, माजी जिप उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी जिप सदस्य मच्छिंद्र क्षिरसागर, माजी सभापती मोहनराव शिंदे, सुधिरनाना पवार, विलासबाबा जवळ, बुवासाहेब पिसाळ, विजयआप्पा शेलार अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील जनता यावेळी अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती.
COMMENTS