सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यामध्ये यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आगे. यातच शेळी मेंढी यांनाही चराईसाठी वन वन हिंडावे लागत आहे. दरम्यान, पुरंदर मधील मेंढपाळांना शेळ्या- मेंढ्यांना चराईसाठी अन्य ठिकाणी फिरावे लागत आहे. यातच मेंढपाळ युवक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटूंब चिंतेत आहे.
पुरंदर तालुक्यातील युवक ताया सोमा महानवर वय 42 रा.राख (बिरोबा वस्ती) ता. पुरंदर जि. पुणे हे आपले शेळ्या मेंढ्या घेऊन चराईसाठी फलटण तालुक्यातील सरडेवाडी येथे गेल्या दोन महिन्या पासून आपली पत्नी व भाऊ यांच्या समवेत गेले होते. दिवसभर शेळ्या मेंढ्या चारून संध्याकाळचा मुक्काम तेथील शेतकऱ्यांच्या रानातच करीत असत
शुक्रवार दि २२ रोजी पहाटे चार वाजल्यापासून ताया महानवर आपली पत्नी व भाऊ झोपेत असतानाच अचानक बेपत्ता झाला आहे. त्याच्या कुटूंबियांनी सगळीकडे शोधाशोध करूनही तो न सापडल्याने व अद्याप पर्यंत घरी न परतल्याने पती बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांची पत्नी नकुसा ताया महारनवर व भाऊ बाळू सोमा महारनवर यांनी फलटण पोलीस ठाण्यात दिली आहे
. या युवकाचे वर्णन उंची पाच फूट पाच इंच वर्ण गोरा अंगात काळी पॅन्ट पांढरा शर्ट गळ्यात तुळशीची माळ व गालावर पूर्ण वाढलेली दाढी असा आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास फलटण पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन फलटण पोलिसांनी केले आहे . तसेच
बाळू महानवर मो.नं 9922017881. व. 7304859397. या मोबाईल नंबर वरती ही संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे