Baramati News l पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी केतन भोसले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता -बारामती येथील केतन रमेश भोसले यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
        बारामतीतील कामगार मेळावाच्या कार्यक्रमात खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आला होता. निवडीचे पत्र आमदार रोहित  पवार स्वप्निल गायकवाड़ (अध्यक्ष युवक पुणे जिल्हा) यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष Ad.एस.एन. जगताप, प्रचारप्रमुख सदाशिव सातव, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, औद्योगिक सेल तालुक़ाध्यक्ष राजेंद्र जगताप, युवक कार्याध्यक्ष गौरव जाधव, प्रवीण भोसले उपस्तिथ होते.
To Top