Baramati News l निंबुत परिसरात विहीरीवरील मोटार केबल चोरांचा धुमाकूळ : ऐन उन्हाळ्यात शेतकरी मेटाकुटीला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे बारामती व पुरंदर तालुक्यातील शेतकरी अगोदरच हवालदील झालेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न तर आणखीनच गंभीर बनलेला आहे. पिण्याच्या पाण्याचे व जनावराच्या चाऱ्या पाण्याची समस्या सोडवताना शेतकरी हवालदील झालेला आहे त्यातच विहिरीवरील मोटर केबल तसेच इतर साहित्य चोरी होण्याचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. 
          गेल्या आठ दिवसापासून नींबूत परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे विहिरीवरील मोटर व केबल चोरी गेलेले आहेत.*8अगोदरच लाईटचा बोजवारा रात्री अप रात्री येणारी लाईट यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून कशीबशी आलेली पिके जगवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. यातच विहिरीवरील मोटर व केबल चोरी झाल्यानंतर शेतकरी आणखीनच मेटाकुटीला येत आहे नींबूत परिसरातील आठ ते दहा शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारींच्या केबल अज्ञाताने चोरून नेले आहेत. पोलीस प्रशासनाने ग्रस्त वाढवून अशा भुरट्या चोरांना वेळीच आळा घालण्याची गरज शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे अशा चोरी झालेल्या मोटर व केबल त्या वितळवून कोणाला विकल्या जातात याकडेही लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे या मोटर व केबल चोरांच्या कडून विकत घेणारे अनेक महाठग या परिसरात आहेत अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे.
To Top