सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती - प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील हेमंत गडकरी यांची निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष राहुल वाबळे, शहराध्यक्ष जय पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे,पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा मोनिकाताई हरगुडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, बारामतीचे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, जिल्हा बँकेचे संचालक रणजीत तावरे, मदन देवकाते, धनवान वदक, तुषार कोकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेमंत गडकरी उच्चशिक्षित असून तालुक्यातील गावांत त्यांचा चांगला संपर्क असून येणाऱ्या काळात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.