सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मोरगाव : प्रतिनिधी
तरडोली ता. बारामती गावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने बारामती पंचायत समितीच्या वतीने गावाला टँकरद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी सुपा पोलिसांकडे केली आहे.
याबाबत ग्रामपंचायत तरडोलीने सुपा पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत तरडोली मध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून पंचायत समिती बारामती मार्फत तरडोली गावाला पाणी टँकर चालू असून सदर टँकरने गावात पाणी वाटप करीत असताना ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांना शिवीगाळ तसेच मारहाण चे प्रकार वारंवार होत असल्याने कर्मचारी व पदाधिकारी यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. तरी टँकरने पाणी वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सोबत पोलीस पाटील व पोलीस संरक्षण मिळावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
------------------
ग्रामपंचायतने केलेला ठराव----
आम्ही गेली ३ वर्षापासून ग्रामपंचायत तरडोली येथे पाणीपुरवठा करण्याचे काम करीत आहोत. गेल्या ३ महिन्यापासून गावाला टँकरने गावात पाणी वाटप करीत असताना ग्रामस्थानकडून शिवीगाळ तसेच मारहाण होत आहे. त्यामुळे संरक्षण मिळणे बाबतच्या अर्जाचे सभेत वाचन करणेत आले. त्यावेळी कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांना पोलीस संरक्षण मिळणेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुपा पोलीस स्टेशन. सुपा. ता. बारामती जि, पुणे यांच्याकडे पत्र व्यवहार करणेत यावा. असे सभेत सर्वानुमते ठरले .
COMMENTS